साहित्य संमेलनाला कोणी आपल्या सोयीसाठी व स्वार्थासाठी वापरू पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ हा मराठी समाजाच्या आस्थेचा व आनंदाचा सर्वोच्च सोहळा आहे. कालौघात त्यात गरजेनुसार इष्ट ते बदल झाले; समाजाच्या गरजेनुसार भविष्यातही होत राहतील; ते आवश्यकही आहेत. पण या सोहळ्याला कोणी आपल्या सोयीसाठी व स्वार्थासाठी वापरू पाहत असेल, चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करत असेल तर भिडेला बळी न पडता त्याला अटकाव केला पाहिजे.......

उस्मानाबाद साहित्य संमेलनानं दोन गोष्टी शिकवल्या. लोकांच्या साहाय्यानं संमेलन करता येतं आणि काटेकोर मांडणी केली तर कमी खर्चात दर्जेदारही होतं

संमेलनाच्या तयारीच्या काळात महाराष्ट्रात निवडणुकीचा मोसम होता. कधी नव्हे तो हा मोसम राजकीय अस्थिरतेचा होता. या काळात निवडणुकीच्या निमित्ताने अनेक उलथापालथी व पक्षबदल घडले. राजकीय पुढारी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडू लागले. उलटसुलट निर्णय घेऊ लागले. अशा स्थिरतेच्या काळात कोणत्याही शहाण्या माणसाने संमेलन त्यांच्या हातात दिले नसते. म्हणून मीही तेच केले आणि संमेलनावरचे अनिश्चिततेचे सावट दूर केले.......